भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने मद्रास उच्च न्यायालयामध्ये पोलीस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरोधातील खटल्यात दाद मागितली आहे. या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा असं धोनीने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयासंदर्भात संपत यांनी केलेल्या विधानांच्या आधारे धोनीने ही मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने २०१४ साली संपत यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. त्यावेळेस संपत हे इनस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर कार्यरत होते. मॅच-फिक्सिंगसंदर्भात संपत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धोनीने न्यायालयामध्ये धाव घेतली होती. संतप यांनी आपल्याविरोधात अशी कोणतीही विधानं करु नयेत असे निर्देश न्यायालयाने द्यावेत अशी धोनीची मागणी होती. तसेच झालेल्या आब्रुनुकसानीचा मोबदला म्हणून १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी अशीही मागणी धोनीने केली होती. न्यायालयाने या पोलीस अधिकाऱ्याला धोनीविरोधात विधानं न करण्याचे निर्देश दिले होते. आयपीएलमध्ये झालेल्या मॅच-फिक्सिंग प्रकरणानंतर या गोष्टी घडल्या होत्या.

Sameer Wankhede, Narcotics case,
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

यानंतर धोनीने संपत यांच्याविरोधात पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली असून प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. संपत यांनी न्यायव्यवस्था आणि काही वकिलांबद्दल अपमानास्पद विधानं केल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. १८ जुलै रोजी धोनीने महाअभिवक्त्यांकडून या अधिकाऱ्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यासंदर्भातील संमती घेतली होती. ही संमती मिळाल्यानंतरच धोनीने आता मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.