भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला यंदाच्या टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. पण तो आता सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत २० सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व करेल. यादरम्यान युवा सलामीवीर पृथ्वी शॉ संघाचा उपकर्णधार असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सोमवारी भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या वेबसाइटवर संघाची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद यल्विगी यांचा समावेश असलेल्या मुंबई निवड समितीने संघातील तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण केले आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे आणि सिद्धेश लाड यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनी संघात स्थान मिळवले आहे. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, सरफराज खानसह अष्टपैलू शिवम दुबे सारख्या आक्रमक फलंदाजांचीही संघात निवड झाली आहे.

हेही वाचा – T20 WC IND vs ENG : भारताचा विजयारंभ; इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी

गोलंदाजीचे नेतृत्व धवल कुलकर्णी करेल, ज्यात तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, डावखुरा मध्यमगती गोलंदाज रॉयस्टन डायझ यांचाही समावेश आहे. फिरकी हल्ल्याचे नेतृत्व डावखुरा गोलंदाज शम्स मुलानी करणार आहे. मुंबई संघ गुवाहाटीमध्ये आपले साखळी सामने खेळेल.

मुंबईचा संघ:

अजिंक्य रहाणे (कप्तान), पृथ्वी शॉ (उप-कप्तान), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सरफराज खान, प्रशांत सोलंकी, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तमोर, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटील, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जयस्वाल, तनुश कोटियन, दीपक शेट्टी आणि रॉयस्टन डायझ.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai announce squad for syed mushtaq ali trophy ajinkya rahane to lead adn
First published on: 18-10-2021 at 23:47 IST