आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना रंगणार आहे. Espncricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. १७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.