Mumbai Indians Record In IPL History : पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. अनेक वेळा कठीण परिस्थितीत सावध खेळी करत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ट्रॉफीवर विजयाची पताका फडकावली आहे. मुंबई इंडियन्सच्या अशाच एका अनोख्या विजयाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबई इंडियन्सनेच हा पराक्रम करून दाखवला आहे. आयपीएलच्या इतिहासात मागील १५ वर्षांपासून हा विक्रम मुंबई इंडियन्सच्याच नावावर कायम आहे.

…म्हणून मुंबई इंडियन्सचा झाला सर्वात मोठा विजय

आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ३८ सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सचिनने घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सत्यात उतरवून दाखवला. मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या आख्ख्या संघाला ६७ धावांवर गारद केलं.

नक्की वाचा – MI Vs UPW : सोफीच्या फिरकीनं कर्णधार हरमनप्रीतला गुंडाळलं; पण सिवरने यूपीच्या गोलंदाजांची केली धुलाई, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर ६८ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याने १७ चेंडूत ४८ धावा कुटल्या. त्यामुळे मुंबईने पॉवर प्लेमध्ये ५.३ षटकांत ६८ धावांवर २ विकेट्स गमावत कोलकाताचा दारुण पराभव केला होता. मुंबई इंडियन्सने ८७ चेंडू राखून या सामन्यात विजय मिळवल्याची नोंद आयपीएलच्या इतिहासात करण्यात आली. १५ वर्षांपासून हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर कायम आहे.