कुडूस, वाडा येथे सुरू असलेल्या ४०व्या कुमार/ कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटात मुंबई उपनगर, नाशिक संघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. कुमार गटात नंदुरबार, रायगड यांनी उपांत्य फेरी गाठली.
कुमारी गटाच्या लढतीत उपनगरने उस्मानाबादचा ६०-२० असा धुव्वा उडवला. उपनगरतर्फे सायली जाधवने ७ चढायांत ९ गुण पटकावले.नाशिकने सिंधुदुर्गवर १७-९ अशी मात
केली.
कुमार गटात नंदुरबारने बीडचे आव्हान १६-१३ असे संपुष्टात आणले. नंदुरबारच्या विजयात आकाश इवले चमकला. रायगडने नांदेडचा २६-१७ असा पराभव केला. भरत मालुसरे रायगडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
मुंबई उपनगर उपांत्य फेरीत
कुडूस, वाडा येथे सुरू असलेल्या ४०व्या कुमार/ कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटात मुंबई उपनगर
First published on: 12-11-2013 at 07:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai suburb in semi final in kabaddi