Naseem Shah posted an emotional post after being ruled out of the World Cup: विश्वचषकापूर्वी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही. नसीम शाहच्या जागी हसन अलीला संघाचा भाग बनवण्यात आले आहे. आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नसीम शाह जखमी झाला होता. यानंतर या खेळाडूला टूर्नामेंट मध्येच सोडावी लागली. मात्र, वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर नसीम शाहने चाहत्यांसाठी एक भावनिक संदेश दिला आहे.

काय म्हणाला नसीम शाह?

नसीम शाहने आपल्या इन्स्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले की, “जड अंतःकरणाने आणि भावनांनी मला सांगायचे आहे की या अद्भुत संघात मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. मला माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानायचे आहेत.”

त्याने पुढे लिहिले की, संघाचा भाग नसल्यामुळे तो खूप दुःखी आहे. पण माझा विश्वास आहे की सर्व काही अल्लाहच्या हातात आहे. मी लवकरच मैदानात परतेन. आम्ही सर्व मिळून आमच्या टीमला सपोर्ट करू असेही तो म्हणाला. आमचा संघ पूर्णपणे सक्षम आहे, ते आमच्या देशाला अभिमान वाटण्याची संधी देतील.

पीसीबीचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक काय म्हणाले?

पीसीबीचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी नसीम शाहला वर्ल्ड कपमधून वगळल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. लाहोरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना इंझमाम उल हक म्हणाला की, नसीम शाह हा आमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे यात शंका नाही, पण तो दुखापतग्रस्त आहे. ते म्हणाले की, डॉक्टरांच्या अहवालानुसार नसीम शाह वर्ल्ड कपपर्यंत तंदुरुस्त होणार नाही. सध्या माझ्या दृष्टीने नसीम शाह हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, असेही तो म्हणाला. मात्र वर्ल्ड कपमध्ये न खेळणे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. आम्हाला आशा आहे की नसीम शाह लवकरच परतेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वचषकासाठी पाकिस्तान विश्वचषक संघ –

फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी. हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली