Natasa Stankovic is return in Mumbai : क्रिकेटर हार्दिक पंड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक दीड महिन्यानंतर मुंबईत परतली आहे. काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान नताशा १५ जुलै रोजी मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती. यानंतर, १८ जुलै रोजी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि तिने आणि हार्दिकशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. आता ती २ सप्टेंबरला मुंबईत परतली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माहिती दिली आहे.

मुंबईत पोहोचल्यावर केली पहिली पोस्ट –

सोमवारी सकाळी सहा वाजता नताशा मुंबईत दाखल झाली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा मुलगा अगस्त्य तिच्यासोबत दिसत नाही. अशा परिस्थितीत ती एकटीच मुंबईत आल्याचे समजते. ती मुंबईत पोहोचल्यावर मुंबईच्या पावसाने तिचे स्वागत केले. तिने दोन तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर मुंबईच्या रस्त्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि ‘हॅलो मुंबई’ लिहून पावसाचे इमोजी शेअर केले.

नतासा स्टॅनकोविकची मुंबईत पोहोचल्यानंतरची इन्स्टा स्टोरी
नतासा स्टॅनकोविकची इन्स्टा स्टोरी

नताशा मुंबईत का परतली?

हार्दिक पंड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा मुंबईत परतल्याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. तसेच ती अचानक मुंबईत का परतली असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत आहे. याबद्दल काहीही सांगणे कठीण असले तरी नताशा पुन्हा मॉडेलिंगच्या दुनियेत परतण्याचा मार्ग शोधत असावी असे वाटते. अलीकडे नताशा सतत तिचे सर्वोत्तम फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र, ती पुन्हा मुंबईत मॉडेलिंग करण्यासाठी आली आहे की नाते सुधारण्यासाठी ती परतली आहे हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – ९ वर्षांचा असताना उद्यानात पडला अन् उठलाच नाही… आता पदक जिंकून वाढवली देशाची शान, जाणून घ्या कोण आहे योगेश कथुनिया?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नताशा स्टॅनकोविकची एकूण संपत्ती –

नताशा स्टॅनकोविक एक सर्बियन नृत्यांगना आणि मॉडेल आहे. २०१२ मध्ये अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन नताशा सर्बियाहून भारतात आली. भारतात आल्यानंतर तिने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस 8’ मध्ये भाग घेतला आणि महिनाभर घरात राहिली. २०२४ पर्यंत तिने अनेक ब्रँडचे प्रमोशन आणि चित्रपट केले. एका अहवालानुसार, १२ वर्षे काम केल्यानंतर तिची एकूण संपत्ती आता २० कोटी रुपये आहे.