NZ and SA Price Money In World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला जगातील सर्वात मोठं स्टेडियममध्ये रंगणार आहे. यजमान राष्ट्र भारत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. ४५ लीग सामन्यांनंतर भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पात्र ठरले होते. यामध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या हाय व्होल्टेज नॉकआऊट सामन्यात विजयी होत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. किवी आणि प्रोटीज अंतिम फेरीत पोहोचले नसले तरी त्यांना वनडे विश्वचषकातील अव्वल चार संघ म्हणून मोठी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 बक्षीस रक्कम:

स्पर्धेच्या घोषणेच्या वेळी दिलेल्या माहितीनुसातर विश्वचषक विजेत्या संघाला तब्बल ४०,००,००० डॉलर्स म्हणजेच ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाला सुद्धा ठराविक रक्कम व लीग टप्यातील प्रत्यक्ष विजयासाठी ४०,००० हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार होते. यानुसार आता उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या न्यूजहीलांड व दक्षिण आफ्रिकेला किती बक्षीस मिळणार हे पाहूया..

दक्षिण आफ्रिका बक्षिसाची रक्कम

दक्षिण आफ्रिकेने लीग टप्यात 7 विजय नोंदवले होते. यानुसार प्रत्येक सामन्याचे ४० हजार डॉलर पकडून त्यांना २.८० लाख डॉलर्स अर्थात २ कोटी २४ लाख रुपये बक्षीस अगोदरच मिळणार होते. याविषयी आता उपांत्य फेरीत पोहोचल्याचे अतिरिक्त ८ लाख डॉलर्स म्हणजे साधारण ६ कोटी रुपये त्यांना मिळणार आहेत. एकूण दक्षिण आफ्रिकेने भारतात विश्वचषकाच्या दरम्यान ८ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

न्यूझीलंडला किती बक्षीस?

न्यूझीलंडने लीग टप्यात ५ विजय नोंदवले होते. यानुसार प्रत्येक सामन्याचे ४० हजार डॉलर पकडून त्यांना २ लाख डॉलर्स अर्थात १ कोटी ६० लाख रुपये बक्षीस मिळणार होते. याविषयी आता उपांत्य फेरीत पोहोचल्याचे अतिरिक्त ८ लाख डॉलर्स म्हणजे साधारण ६ कोटी रुपये त्यांना मिळणार आहेत. एकूण न्यूझीलंडने भारतात विश्वचषकाच्या दरम्यान ८ कोटींच्या आसपास (७ कोटी ६० लाख) रुपयांची कमाई केली आहे.

हे ही वाचा<< Video: विराट कोहलीला स्वतःच्या दिसण्याचा वाटायचा कमीपणा? म्हणाला, “आरशात बघून वाटायचं तुला कोण.. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारच्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले असून स्वतः नरेंद्र मोदी, भारतीय माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, बॉलिवूड कलाकार व अन्य भारतीय खेळाडू शुद्ध उपस्थित राहण्याची शक्यता आहे.