ICC World Cup, ENG vs NZ Live Streaming: आयसीसी विश्वचषकाचा पहिला सामना गेल्या विश्वचषक विजेत्या इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध समान संख्येने सामने जिंकले आहेत.

वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड एकूण १० वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी केवळ पाच सामने जिंकले आहेत. जर विश्वचषक २०१९ बद्दल बोलायचे झाले तर, फायनलमधील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबाबत बरेच वाद झाले होते. हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला पण, शेवटी इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.

ipl 2024 livingstone returns to england
गुडघ्याच्या दुखापतीमुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी ; बटलर, जॅक्स, टॉपलीही इंग्लंडला परत
Afghanistan Fan Misbehaves With Shaheen Afridi Video Viral
IRE vs PAK 2nd T20I : अफगाणिस्तानच्या चाहत्याने शाहीन आफ्रिदीशी केले गैरवर्तन, VIDEO होतोय व्हायरल
MS Dhoni completes 250 sixes in IPL
GT vs CSK : धोनीने डिव्हिलियर्सच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Richard Gleeson debuts in IPL
Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
Good news for LSG team Mayank Yadav available for match against Mumbai
Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज

आता विश्वचषकाचा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडला मागील धावसंख्येवर तोडगा काढायचा आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ९५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४५ सामने इंग्लंडने तर ४४ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तर ४ सामने अनिर्णित राहिले आणि एक बरोबरीत सुटला. या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७ वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करताना २७ वेळा विजय मिळवला आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड: काय आहे आकडेवारी?

सामना: १०

इंग्लंड जिंकले: ५

न्यूझीलंड जिंकले: ५

प्रथम फलंदाजी करून इंग्लंड जिंकला: ४

प्रथम गोलंदाजी करून इंग्लंड जिंकले: १ (२०१९ विश्वचषक बरोबरीत)

प्रथम फलंदाजी करून न्यूझीलंड जिंकला: १

प्रथम गोलंदाजी करून न्यूझीलंड जिंकला: ४

इंग्लंडचे सर्वोत्तम: ३२२

न्यूझीलंडचे सर्वोत्तम: ३२२

इंग्लंडची सर्वात कमी धावसंख्या: १२३

न्यूझीलंडची सर्वात कमी धावसंख्या: १८६

हेही वाचा: Kishore Jena: आठ वर्षांपूर्वी व्हॉलीबॉल सोडला अन् भालाफेकीला केली सुरुवात, एशियाडमध्ये जिंकले रौप्य पदक; म्हणाला, “दोन वर्षे घरी…”

इंग्लंड आणि न्यूझीलंड विश्वचषक संघ

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, विल तरुण.

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ उद्यापासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मेगा स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता खेळवला जाईल. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ते जाणून घ्या.

हेही वाचा: Asian Games: एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केली पदकांची लयलूट, पुरुष संघाने ४x४०० मीटर रिलेमध्ये जिंकले सुवर्ण, तर महिलांनी रौप्यपदक

विश्वचषकाचा पहिला सामना कुठे खेळला जाईल?

वर्ल्ड कप २०२३चा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

विश्वचषक २०२३चा पहिला सामना किती वाजता खेळला जाईल?

वर्ल्ड कप २०२३चा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचे थेट प्रवाह डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध असेल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर केव्हा आणि कुठे पाहायचा?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचे थेट प्रक्षेपण Star Sports1, Star Sports 2, Star Sports HD 1 आणि Star Sports HD 2 वर उपलब्ध असेल.