New Zealand Won 1st Time Test Series Against South Africa : केन विल्यमसनच्या ३२व्या कसोटी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी हॅमिल्टनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे ९२ वर्षानंतर पहिल्यांदा न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली आहे. अशा प्रकारे न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. याचा फटका आता ऑस्ट्रेलियासह टीम इंडियालाही बसला आहे.

न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही प्रथमच जिंकली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९३२ पासून कसोटी मालिका खेळली जात आहे. दोघांमध्ये आतापर्यंत १८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने १३ कसोटी मालिका जिंकल्या, तर ४ अनिर्णित राहिल्या. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates in marathi
IPL 2024 : रियान परागच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीला दिले १८६ धावांचे लक्ष्य
Shikhar Dhawan First Batsman To Hit 900 Boundaries
IPL 2024 : शिखर धवनने पहिल्या सामन्यात रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
Punjab Kings beat Delhi Capitals on the strength of Sam Karan's powerful half-century
IPL 2024 : लिव्हिंगस्टोनचा विजयी षटकार आणि पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय, सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार

भारत तिसऱ्या स्थानावर घसरला –

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची विजय-पराजयची टक्केवारी ७५ वर पोहोचली आहे. न्यूझीलंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारताचे नुकसान झाले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ अव्वल तर भारत दुसऱ्या स्थानावर होता. आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर भारत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. यापूर्वी इंग्लंड आठव्या क्रमांकावर होता. आता इंग्लंड सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेची विजय-पराजयाची टक्केवारी आता २५ आहे.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : रविचंद्रन अश्विनची चूक भारताला पडली महागात! फलंदाजीला न येता इंग्लंडला मिळाल्या पाच धावा

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चुरशीची लढत –

या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च आणि दुसरा सामना ८ ते १२ मार्च या कालावधीत वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे होणार आहे. अशा स्थितीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

न्यूझीलंडला आशा असेल की केन विल्यमसनने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धही आपला अलीकडचा मजबूत फॉर्म कायम ठेवावा. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या कसोटी फलंदाजाने नुकत्याच झालेल्या सात कसोटी सामन्यांमध्ये सात शतके झळकावली आहेत. सर्वात कमी डावात ३२ कसोटी शतके झळकावणारा तो फलंदाज ठरला आहे.