पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा अजिबात धक्का बसला नसून उलट संघात अनुभवाची कमतरता असूनही संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीने प्रभावित झाल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
कोहली म्हणतो, पराभवाचा मला अजिबात धक्का बसलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाऊ शकलो यावर मी प्रभावित झालो आहे. संघातील प्रत्येक जण उत्तम कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघात अनुभवी फलंदाज असूनही भारतीय गोलंदाजांनी अनुभवाची कमतरता असूनही कडवे आव्हान दिले असल्याचेही कोहली म्हणाला. यावेळी त्याने अमित मिश्राच्या गोलंदाजीची प्रशंसाही केली.
आशिया चषकात गेल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आशिया चषकात अपयशाची टांगती तलवार भारतीय संघावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
पराभवाचा धक्का नाही; उलट सांघिक कामगिरीवर प्रभावित- कोहली
पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा अजिबात धक्का बसला नसून उलट संघात अनुभवाची कमतरता असूनही संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीने प्रभावित झाल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

First published on: 03-03-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not shocked by loss impressed with teams character kohli