scorecardresearch

WPL 2023, GGW vs UPW: यूपीच्या विजयाने गुजरातसह बंगळुरूच्या आशा मावळल्या, जायंट्सवर तीन विकेट्सने मात

महिला प्रीमिअर लीगमधील रोमांचक झालेल्या आजच्या सामन्यात यूपी वॉरिअर्सने गुजरात जायंट्सवर तीन विकेट्सने शानदार विजय मिळवत प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के केले.

WPL 2023 GGW vs UPW: Bengaluru's hopes dashed with UP win as Gujarat beat giants by three wickets
सौजन्य- WPL २०२३ (ट्विटर)

आज महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना यूपी वॉरियर्सशी संपन्न झाला. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होता. पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता त्यात यूपी वॉरिअर्सने गुजरात जायंट्सवर तीन विकेट्सने शानदार विजय मिळवत प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के केले. त्याचबरोबर हा विजय त्या संघाला प्लेऑफच्या जवळ घेऊन गेला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तीन संघ फक्त एका जागेसाठी लढत होते. आजच्या विजयाने बंगळुरूच्या देखील आशा मावळल्या आहेत.

महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा तीन विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह यूपी संघाने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या विजयासह यूपीचे सात सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. त्याचा अजून एक सामना बाकी आहे. त्याचबरोबर गुजरातचे आठही सामन्यांतून चार गुण आहेत. बंगळुरूचेही सात सामन्यांनंतर चार गुण आहेत. जरी आरसीबी संघाने शेवटचा सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त सहा गुण मिळवू शकतील आणि यूपीशी बरोबरी करू शकणार नाहीत.

ग्रेस हँरिसचे झुंजार अर्धशतक

गुजरातने ठेवलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. देविका वैद्य ७ (८) आणि कर्णधार अलिसा हिली १२ (८) फार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली किरण नवगिरे ४ (४) धावा करून बाद झाली. ताहिला मॅकग्रा आणि ग्रेस हँरिस या दोघींनी डाव सावरत यूपीला गुजरातने केलेल्या धावसंख्यानजीक नेले. जेणेकरून गुजरातवर दबाब आणता येईल आणि तसेच झाले. दोघींनी आधी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. ताहिलाने ३८ चेंडूत ५७ धावांवर बाद झाली तिने तब्बल ११ चौकार मारले. त्यानंतर ग्रेस हँरिसने सगळी सूत्रे आपल्या हाती घेत ४१ चेंडूत ७२ धावांची विजयी खेळी केली. तिने ७ चौकार आणि ४ षटकारांचा साज आपल्या अर्धशतकी खेळीला चढवला. मात्र ऐन मोक्याची क्षणी ती हरलीन देओलकरवी झेलबाद झाली. मग आलेली दीप्ती शर्मा आणि सिमरन शेख अनुक्रमे ६ व १ धाव करून बाद झाली. सोफी एक्लेस्टोनने १३ चेंडूत १९ धावा करून यूपीला प्ले-ऑफचे दार उघडून दिले. गुजरातकडून किम गर्थने सर्वाधिक २ विकेट्स घेतले. मोनिका पटेल, स्नेह राणा, ऍशले गार्डनर आणि तनुजा कंवर यांना एक-एक विकेट घेण्यात यश आले. हरलीन देओलला एकही विकेट घेता आली नाही.

हेही वाचा: Ujjain Mahakal: IPL ची तयारी! कपाळावर चंदन, धोतर-कुडता घालून केकेआरचा ‘हा’ क्रिकेटर पोहोचला महाकालच्या दर्शनाला; पाहा Video

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ गडी गमावून १७८ धावा केल्या. दयालन हेमलताने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या तर ऍशले गार्डनरने ३९ चेंडूत ६० धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.५ षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. ताहिला मॅकग्राने ३८ चेंडूत ५७ धावा आणि ग्रेस हॅरिसने ४१ चेंडूत ७२ धावा केल्या.गुजरातची सुरुवात चांगली झाली. सोफिया डंकले आणि एल वोल्वार्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने १७ आणि डंकलेने २३ धावा केल्या. हरलीन देओलला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि ऍशले गार्डनर यांनी ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या