India vs New Zealand, World Cup 2023: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान भारतीय खेळपट्ट्यांच्या रेटिंगबाबत आयसीसीला प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना द्रविडने आपले मत व्यक्त केले. भारताच्या पाकिस्तान (अहमदाबाद) आणि ऑस्ट्रेलिया (चेन्नई) विरुद्धच्या सामन्यांमध्ये वापरल्या गेलेल्या खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी मानांकन दिले होते. यावर द्रविडने आयसीसीकडे असहमत व्यक्त करत सडेतोड उत्तर दिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ आक्रमक फलंदाजी न करता विविध कौशल्ये दाखवली पाहिजेत यावर द्रविडने भर दिला.

आयसीसीने १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आणि ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या सामन्यांमध्ये वापरल्या गेलेल्या खेळपट्ट्यांना ‘सरासरी’ रेटिंग दिले होते. ही रेटिंग स्पर्धेतील इतर खेळपट्ट्यांपेक्षा विरुद्ध होती, ज्यांना ‘चांगले’ किंवा ‘खूप चांगले’ रेटिंग मिळाले होते. अहमदाबादमध्ये भारताने पाकिस्तानला ४२.५ षटकांत १९१ धावांत गुंडाळले, तर चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाला ४९.३ षटकांत १९९ धावांत गुंडाळले.

Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा: IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविडचे हार्दिक पांड्याबाबत सूचक विधान; म्हणाला, “संघाचा समतोल…”

द्रविडने खेळपट्ट्यांच्या गुणवत्तेचा बचाव करताना म्हटले, “त्या दोन खेळपट्ट्यांना दिलेल्या सरासरी रेटिंगशी मी नक्कीच असहमत असेन. मला वाटते की त्या चांगल्या खेळपट्ट्या होत्या. जर तुम्हाला फक्त ३५० धावांचा सामना पाहायचा असेल, तर गोलंदाज का खेळत आहेत? तुम्ही अशाच धावांच्या खेळपट्ट्यांना चांगले रेटिंग देत आहात, मग मी तुमच्या या निर्णयाशी असहमत आहे. मला वाटते की तुम्हाला सामन्यातील भिन्न कौशल्ये पाहावी लागतील. स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता, फिरकी गोलंदाजीचा दर्जा आणि केन विल्यमसन, विराट कोहली आणि के.एल. राहुल या खेळाडूंचे डाव सावरण्याचे कौशल्य हे देखील लक्षात घ्यावे लागेल.” यासारखे खेळाचे विविध पैलू दाखवण्याचे महत्त्व द्रविडने अधोरेखित केले.

“केवळ चौकार आणि षटकारांसह उच्च धावसंख्येच्या सामन्यांना प्राधान्य देणे हा खेळपट्ट्यांना रेटिंग देण्यासाठी योग्य निकष नाही”, असे द्रविडचे म्हणणे होते. एकदिवसीय सामन्यात गोलंदाज आणि फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त मोठे फटके खेळण्यापलीकडे कौशल्याचा समावेश असायला हवा आणि खेळपट्ट्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीच्या गरजेवर द्रविडने भर दिला.

हेही वाचा: IND vs NZ Live, World Cup 2023: २०१९मध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज, विजेता संघ पोहोचेल अव्वल स्थानी

भारतीय प्रशिक्षक पुढे म्हणाला, “जर प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही ज्या काही खेळपट्ट्यांवर सामने खेळले आहेत, त्यातील दिल्ली आणि पुण्यात आम्ही मधल्या षटकांमध्ये स्ट्राईक रोटेट केल्या आहेत. त्याठिकाणी स्ट्राईक रोटेट करणे फार कठीण काम नव्हते. स्पर्धा कोण जास्त चौकार आणि षटकार मारेल याची होती. त्यामुळे माझ्या मते खेळपट्टीचे मूल्यांकन करण्याचा हा एकमेव मार्ग नाही. मला वाटते की चांगली आणि सरासरी खेळपट्टी कोणती हे ठरवण्याचा एक चांगला मार्ग आपल्याजवळ असायला हवा. कधी कधी खेळपट्टी ही थोडी फिरकीला, थोडी स्विंग गोलंदाजांना तसेच, तशीच फलंदाजांना देखील मदत करणारी असावी. आपल्या सर्वांना एकूण ३५० धावांवर षटकार आणि चौकार मारणारी एक चांगली खेळपट्टी पाहण्याची सवय झाली आहे, म्हणून मी आयसीसीच्या या मताशी सहमत नाही.” असे माजी भारतीय कर्णधार म्हणाला.