ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे आज (२८ जून) जलंधरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. भारतीय हॉकीने एकेकाळी फार वैभवशाली दिवस बघितले होते. भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते. त्यामध्ये ऑलिंपिक पदक विजेता आणि विश्वचषक विजेता वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉकी इंडियाने ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. सिंग यांच्या निधनाबद्दल हॉकी इंडियाने शोक व्यक्त केला आहे. “वरिंदर सिंग यांनी मिळवलेले यश जगभरातील हॉकी समुदाय स्मरणात ठेवेल,” असे हॉकी इंडियाने आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

वरिंदर सिंग हे १९७५मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक आहे. तेव्हा भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता.

हेही वाचा – IND vs IRE : मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू उत्सुक; जाणून घ्या संभाव्य संघ

याशिवाय, वरिंदर सिंग हे १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये कास्यपदक विजेत्या संघामध्ये त्यांचा समावेश होता. १९७३मधील अॅमस्टरडॅम विश्वचषकात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही ते भाग होते. १९७४ आणि १९७८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांना रौप्यपदक मिळवण्याची संधी मिळाली होती.

२००७ मध्ये भारतीय हॉकीतील योगदानासाठी वरिंदर सिंग यांना प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic medallist and hockey world cup winner varinder singh passed away at age of 75 vkk
First published on: 28-06-2022 at 16:00 IST