टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज एमसीजी येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने पाकिस्तान आणि इंग्लंडच्या फलंदाजांना मेलबर्न क्रिकेट मैदानावरील स्विंग, गती आणि बाऊन्सचा सामना करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी उपांत्य फेरीत प्रभावी कामगिरी केली. पण कुंबळे म्हणने आहे की, एमसीजी खेळपट्टीवर त्यांना अडचणीचा सामना करावा लागेल.

उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला, तर पाकिस्तानने न्यूझीलंडवर ७ विकेट्सने मात केली. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारताविरुद्ध नाबाद १७० धावांची भागीदारी केली, तर त्यांचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकीय भागीदारी करताना पाकिस्तानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी अनिल कुंबळेने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, ”आम्ही एमसीजीमध्ये पाहिले आहे की स्विंग, बाऊन्स आणि वेग आहे. मला वाटत नाही की ती अॅडलेडच्या खेळपट्टीसारखी असेल. पाकिस्तानला त्याच्यावर लक्ष ठेवावे लागेल आणि इंग्लंडलाही. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी दोन चांगल्या सलामीच्या भागीदारी केल्या होत्या, पण तरीही त्यांना त्या स्विंगवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.”

यासोबतच कुंबळेने असेही म्हटले की, इंग्लंडचा अनुभव आणि फायर पावर असल्यामुळे पाकिस्तानपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पण इंग्लंडने पाकिस्तानला कमी लेखू नये, असे त्यांचे मत आहे. कुंबळे पुढे म्हणाला, “इंग्लंडकडे अनुभव आणि फायर पावर आहे, या बाबतीत त्यांचा निश्चितच वरचष्मा आहे आणि बॉलिंग लाइनअपमध्ये त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत,” तो पुढे म्हणाला. पण पाकिस्तान मजबूत असेल. रविवारी कोणता पाकिस्तान येणार हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा – PAK vs ENG Final: विजेतेपदासाठी आज महामुकाबला; पाहा, हेड टू हेड आकडेवारीत कोणाचे वर्चस्व?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्धचा विक्रम चांगला राहिला नाही. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता पाहावे लागेल की इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक साधणार की पाकिस्तान आपले खाते उघडणार.