बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ सध्या ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये (PAK vs ENG) आहे. इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा करण्याची १७ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर तीन सामन्यांची ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. बेन स्टोक्सने सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्याने जाहीर केले की तो संपूर्ण मालिकेतील त्याची मॅच फी पाकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी देईल.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरून एक ट्विट करताना लिहिले की, या कसोटी मालिकेतील मी माझी मॅच फी पाकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी दान करत आहे.

इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने आपल्या संपूर्ण विधानात म्हटले: “या ऐतिहासिक मालिकेसाठी प्रथमच पाकिस्तानमध्ये येणे खूप छान आहे. कसोटी संघ म्हणून १७ वर्षांनंतर येथे परतणे खूप रोमांचक आहे. लोकांना जबाबदारीची जाणीव आहे. क्रीडा आणि समर्थन गट तेथे असणे खास आहे.” बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानात आलेल्या पूर पाहून खूप वाईट वाटले आणि त्याचा देशावर आणि लोकांवर मोठा परिणाम झाला आहे.”

हेही वाचा – आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००५ नंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघ रविवारी सकाळी पाकिस्तानात दाखल झाला. इंग्लंडने दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तान दौरा केला होता. त्या दौऱ्यात दोन्ही संघात टी-२० मालिका खेळली होती, परंतु अनिश्चित परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या कारणामुळे १७ वर्षे तेथे कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता.