टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ४ विकेटसने विजय मिळवला.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १२८ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने संथ सुरुवात केली. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने पहिल्या विकेट्साठी ५७ धावांची भागीदारी केली. तसेच पहिल्या विकेटच्या रुपाने बाबर आझम बाद झाला. त्याने २५ धावांचे योगदान दिले. दरम्यान त्याच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान देखील लगेच बाद झाला.

त्याने पाकिस्तान संघासाठी सर्वाधिक ३२ धावांचे योगदान दिले. या नंतर पाकिस्तान संघाच्या डावाला गळती लागली. परंतु हॅरीस (३१) आणि मसूदने (२४) संघाचा डाव सावरला. त्यामुळे पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा करत विजय नोंदवला. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तस्कीन अहमद वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. यामध्ये सर्वाधिक कमी धावा नसुम अहमदने दिल्या. त्याने ४ षटकांत फक्त १४ धावा दिल्या.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. बांगलादेश संघाने पावरप्लेच्या समाप्तीनंतर १ बाद ४० अशी धावसंख्या उभारली होती.परंतु त्यानंतर संघाच्या गळतीला सुरुवात झाली. त्यामुळे संघाला शतक झळकावण्या अगोदर ४ विकेट्स गमावल्या. परंतु नजमुल हुसेन शांतोने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४६ चेंडूंत ६ चौकार लगावत ५० धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानचं नशीब पालटलं, शोएब अख्तरने दक्षिण आफ्रिकेसाठी केलं ट्वीट, “तुम्ही C नावाला ..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत २२ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शादाब खानने २ विकेट्स घेतल्या.तसेच हॅरीस रौफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.