न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड डॅरिल मिशेलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर, संघाने निर्धारित २० षटकांत २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तान समोर १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.१ षटकांत ३ गडी गमावत १५३ धावा करत हे लक्ष्य पूर्ण केले.

पाकिस्तान संघाकडून कर्णधार बाबर आझमने अप्रतिम खेळी करत या विश्वचषकातील पहिले अर्धशतक पूर्ण केले आहे. बाबरने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि फॉर्ममध्ये परतला. त्याने ४२ चेंडूत ५३ धावा केल्या. बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. दोन्ही स्टार फलंदाज संघाच्या लयीत आले आहेत. हे दोघेही या विश्वचषकात खराब फॉर्मशी झुंज देत होते, परंतु अंतिम सामन्यापूर्वी ते प्रकाश झोतात आले आहेत. रिझवानने ४३ चेंडूत ५७ धावा केल्या. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने २ आणि मिचेल सॅंटनरने १ विकेट्स घेतली.

हेही वाचा – ICC T20I Rankings: टी२० क्रमवारीत सूर्यकुमार अव्वलस्थानी कायम! विराट, केएल आणि अर्शदीप सिंग यांचे प्रमोशन

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. फिन अॅलनच्या (४) रुपाने पहिल्या षटकात झटका बसला आहे. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पायचित केले. त्यानंतर न्यूझीलंड संघाने सावध भूमिका घेताना पावरप्लेच्या समाप्ती नंतर न्यूझीलंड २ बाद ३८ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन ४२ चेंडूत ४६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. न्यूझीलंड संघाचा डाव सावरताना डॅरिल मिशेल सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह अफ्रिदीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.