पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकदाही त्याने पीसीबीला फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती दिली नाही.

आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत. आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पीसीबीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती दिलेली नाही, मात्र त्याला नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

३५ वर्षीय आसिफने ३५ प्रथम श्रेणी, ४२ लिस्ट ए आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ११८, ५९ आणि ६३ विकेट्स घेतल्या आहेत. आसिफ आफ्रिदीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आहे. आसिफने ३१ ऑगस्ट रोजी नॅशनल टी-२० कपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.

या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी, आसिफचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता. परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुलने घेतले साईबाबांचे दर्शन, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएसएलच्या गेल्या मोसमात, आसिफ अलीने मुलतान सुलतान्सचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने पाच सामन्यांत आठ विकेट घेतल्या. या काळात त्याने केवळ ६.५ च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या. आसिफला पीएसएलमध्ये मोहम्मद नवाजचा कव्हर म्हणून निवडण्यात आला होता. त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला.