scorecardresearch

Border Gavaskar Trophy: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुलने घेतले साईबाबांचे दर्शन, पाहा फोटो

IND vs AUS Test Series: पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार असून, त्यासाठी दोन्ही संघ सराव करत आहेत. नागपूर कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल साईबाबा मंदिरात दर्शनासाठी पोहोचला.

KL Rahul visited Sai Baba Temple before the first Test match against Australia
केएल राहुल (फोटो-ट्विटर)

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या कसोटीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. नागपूर कसोटीपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने साईबाबांचे दर्शन घेतले. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकेश राहुल न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला, त्यानंतर त्याने टी-२० मालिकेतून ब्रेक घेतला होता. लग्नामुळे त्याने ब्रेक घेतला. २३ जानेवारी रोजी त्याने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात सामील झाला.
राहुलचा फोटो ट्विटरवर एका फॅन पेजने शेअर केला आहे, ज्यामध्ये केएल राहुल साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचला. लग्नानंतर तो क्रिकेटच्या मैदानात पुनरानमन करत आहे.

राहुलच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याच्या फॉर्मशी झुंजताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला २२, २३, १० आणि २ धावा करता आल्या. एवढेच नाही तर २०२१ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने कसोटी सामन्यांमध्ये केवळ ३ अर्धशतके झळकावली आहेत.

त्याच्या कसोटी सामन्यांतील एकूण कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने आतापर्यंत ४५ कसोटी सामन्यांमध्ये २६०४ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ३४.२६ इतकी आहे. त्याच्या नावावर ७ शतके आणि १३ अर्धशतके आहेत.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: ‘हा’ खेळाडू टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणार; रवी शास्त्रींना आहे विश्वास

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:38 IST