टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडल्यानंतर पाकिस्तानमध्ये खलनायक बनलेला वेगवान गोलंदाज हसन अली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हिरो ठरला. त्याने सामन्यात २२ धावांत ३ बळी घेतले. या सामन्यादरम्यान हसनने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडूचा विश्वविक्रमही मोडला. अख्तरने २००३ विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.

नक्की प्रकार काय?

बांगलादेशी फलंदाज नजमुल हुसेन शांतोला हसनने हा झेल टाकला. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. टीव्ही स्क्रीनवर दाखवल्या जाणाऱ्या चेंडूचा वेग पाहून चाहतेही हैराण झाले. मात्र, स्पीड गनच्या बिघाडामुळे हा चेंडू २१९ किमी प्रतितास दाखवण्यात आला. चाहत्यांनाही स्पीड गनची चूक समजली आणि त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

हेही वाचा – विश्वास बसतोय का..? राहुल द्रविड भारताव्यतिरिक्त ‘या’ देशासाठी खेळलाय क्रिकेट; ठोकलीत ३ शतकं!

हसन अली अख्तरचा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडू शकला नाही. पण बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने सामन्यात ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

“हा पुरस्कार जिंकणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. टी-२० विश्वचषकात माझी कामगिरी चांगली नव्हती. व्यावसायिक खेळाडू म्हणून चढ-उतार असतील. मी इथे बीपीएलही खेळलो आहे. साधारणपणे ही खेळपट्टी संथ असते”, असे हसनने सामन्यानंतर सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.२ षटकांत लक्ष्य गाठले. बाबर आझमला केवळ ७ धावा करता आल्या. शादाब खान (२१) आणि मोहम्मद नवाज (१८) यांनी १५ चेंडूत ३६ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला ४ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.