नवी दिल्ली : या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ चेन्नई आणि कोलकाताला पसंती देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला यापूर्वीच्या भारत दौऱ्यात चेन्नई आणि कोलकाता ही दोन केंद्रे सुरक्षित वाटली होती, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सूत्रांनी म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून एकूण ४६ सामने देशातील विविध १२ केंद्रांवर खेळवले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, राजकोट, बंगळूरु, दिल्ली, इंदूर, गुवाहाटी, हैदराबाद आणि धरमशाला या केंद्रांचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) आणि ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांवरून बरीच चर्चा झाल्याची माहिती आहे, परंतु या चर्चेतून अजूनही तोडगा निघालेला नाही. भारत सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) काय भूमिका घेते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. या पार्श्वभूमीवर, ‘आयसीसी’कडूनच पाकिस्तानच्या सामन्यांसाठी चेन्नई व कोलकाता या केंद्रांची शिफारस होऊ शकते, असे ‘आयसीसी’च्या सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan prefers chennai kolkata for odi world cup matches zws
First published on: 12-04-2023 at 04:26 IST