Premium

जीवदान मिळाल्यानंतरही फलंदाजाने तीच चूक केली अन् घडलं असं काही…पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘तो’ मजेशीर Video झाला व्हायरल

क्रिकेटच्या मैदानातील तो मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ एकदा पाहाच.

Cricket Funny Video Viral
क्रिकेट सामन्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला. (Image-Twitter)

Cricket Funny Video Viral : पाकिस्तानच्या क्रिकेटर्ससोबत क्रिकेटच्या मैदानावर कॉमेडी ऑफ एरर्स झालेलं अनेकदा समोर आलं आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा वेगळ्या अंदाजात रन आऊट होणे असो किंवा लॉलीपॉप कॅच असो. पण आता आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. मैदानावर घडलेला तो प्रसंग पाहून तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत. टी-२० ब्लास्ट टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर हैदर अली अनोख्या अंदाजात स्टंप आऊट झाला. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चेंडू खेळल्यानंतर हैदर क्रिज सोडून धाव काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु, चेंडू विकेटकीपर जवळच असतो. अशातच विकेटकीपरला स्टंप आऊट करण्याची संधी मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारविकशायर आणि डर्बीशायरच्या सामन्यादरम्यान हा मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. डर्बीशायरच्या इनिंगवेळी हैदर अली स्टंप आऊट झाला. फिरकीपटू डॅनी ब्रिग्सच्या चेंडूवर हैदर पुढे जाऊन हवाई शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. अशातच गोलंदाजाने चालाखीने यॉर्कर लेंथ टाकल्याने फलंदाजाने चेंडू मिस केला. मात्र, विकेटकीपरचा चेंडू पकडण्याचा पहिला प्रयत्न फसला. अशातच हैदरला पुन्हा क्रिजवर परत येण्याची संधी होती. हैदर क्रिजवर येण्याचा प्रयत्न करत असताना असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

नक्की वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यापुढं मार्नस लाबुशेनची दांडी गुल, पाहा जबरदस्त गोलंदाजीचा Video

इथे पाहा व्हिडीओ

एकदा जीवदान मिळाल्यानंतर फलंदाज हैदर पुन्हा क्रिजच्या बाहेर जाऊन धाव घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचदरम्यान विकेटकीपर त्याला स्टंप आऊट करतो. त्यानंतर हैदर पुरता गोंधळात पडतो की, अखेर त्याच्यासोबत असं का घडलं. तसच नॉन स्ट्राईकवर असणारा फलंदाजालाही आश्चर्याचा धक्का बसतो. हा मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. वारविकशायरने २० षटकात ७ विकेट्स गमावत २०३ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे डर्बीशायरने १९.३ षटकात २०७ धावा करून सामना खिशात घातला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 23:20 IST
Next Story
WTC Final IND vs AUS: कांगारुंसमोर टीम इंडियाची सपशेल शरणागती, फॉलोऑन टाळण्यासाठी २६९ धावांची गरज, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत