PAK vs AUS, World Cup 2023: विश्वचषक २०२३चा उत्साह चाहत्यांमध्ये जबरदस्त आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अफगाणिस्तान-इंग्लंड सामन्याने विश्वचषकाची उत्कंठा वाढवली आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर बाबर आझमच्या संघाला २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. त्यासाठी त्यांना मधल्या काळात पाच दिवसांची विश्रांती मिळाली. पाच वेळच्या चॅम्पियन्सविरुद्ध संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल आणि पाच दिवसांची विश्रांती त्यांना निश्चितच मदत करेल.

पाकिस्तानी खेळाडू बंगळुरूमध्ये विश्रांतीचा पुरेपूर वापर करत आहेत

मात्र, पाकिस्तानी संघाने या पाच दिवसांच्या विश्रांतीच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेतला. सध्या बाबरसह संपूर्ण संघ बंगळुरूमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी संघ रात्रीच्या जेवणासाठी बंगळुरूमध्ये पोहोचला होता. पाकिस्तानचा संघ सध्या भारताविरुद्धचा पराभव विसरण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमधील मोकळ्या लाउंजमध्ये डिनरचा आनंद घेताना दिसत होते.

व्हिडीओमध्ये बाबर आझम, हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद हॅरिस, वसीम ज्युनियर, अबरार अहमद, शादाब खान, इमाम उल हक, सौद शकील, हसन अली दिसत आहेत. मोहम्मद हॅरिस, अबरार, वसीम आणि हारिस रौफ सर्व्हरवर जाऊन जेवण घेताना दिसत आहेत. यादरम्यान काही खेळाडू तिथे फोटो सेशनही करून घेतात. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंसोबत सेल्फी काढले.

पाकिस्तानी संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत

पाकिस्तान संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण आहेत. त्यांचा रनरेट हा -०.१३७ आहे. भारत सहा गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंड सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे आगामी सामने मोठ्या संघाबरोबर आहेत. २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया, २३ ऑक्टोबरला अफगाणिस्तान, २७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका, ३१ ऑक्टोबरला बांगलादेश, ४ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि ११ नोव्हेंबरला इंग्लंडचा सामना होणार आहे.

हेही वाचा: AUS vs SL: “तुझ्या वडिलांनी तुला डिफेन्स शॉट…?” ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गावसकरांच्या खास प्रश्नावर मार्शने दिले मजेशीर उत्तर

विश्वचषक स्पर्धेतील १४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर सोमवारी (१६ ऑक्टोबर) विजयासह त्याने स्पर्धेत आपले खाते उघडले. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह पाचवेळच्या चॅम्पियन संघाचे दोन गुण झाले.