टी- विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सने पाकिस्तानला हरवून आपल्या संघाला पुन्हा विश्वविजेता बनवले. या सामन्यातील विजयासोबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. असे जरी असले तरी इंटरनेटवर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोबद्दल चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. या फोटोत नक्की काय आहे ते पाहूया.

या फोटोत असे काय आहे?

या फोटोबद्दल बोलताना पाकिस्तानी रिपोर्टर एहतिशाम उल हकने हा फोटो शेअर केला आहे. पत्रकाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात एक भारतीय पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन पाकिस्तानला पाठिंबा देत आहे.”

मात्र, या भारतीय चाहत्याने पाकिस्तानचा झेंडा पकडल्याचे फोटोत कुठेही दिसत नाही. फोटो नीट पाहिल्यास त्या भारतीय चाहत्यासमोर बसलेल्या चाहत्याने पाकिस्तानचा झेंडा पकडला आहे. त्याचवेळी, असे दिशाभूल करणारे ट्विट केल्यावर, पाकिस्तानी चाहत्यांनी या पत्रकाराला फटकारण्यास सुरुवात केली की, एखाद्याबद्दल अशा चुकीच्या गोष्टी पसरवून, त्याच्याशी किती चुकीचे होऊ शकते याची कल्पना यावी.

विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत आणि केवळ क्रिकेटच नाही तर दोन्ही देशांमधील राजकीय तणावही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत एखादा भारतीय पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसला, तर लोकांचा रोष होतो. ती व्यक्ती आणि त्याचे कुटुंबही मोठ्या संकटात सापडते आणि जीवाला धोका निर्माण होतो.

पत्रकाराच्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टनंतर ट्विटरवर चाहत्यांनी त्याला चांगलेच फटकारले, बघूया चाहत्यांच्या प्रतिक्रिया.

हेही वाचा – केवळ मुस्लीम असल्याने मोईन अली अन् राशिद खान मंचावरुन खाली उतरले; कारण वाचून इंग्लंडच्या संघाचा वाटेल अभिमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.