Who is Palash Muchhal: सांगलीची स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे. नॅशनल क्रश असलेली भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल याने केली आहे. पलाश मुच्छल नेमका कोण आहे, त्याचं नेटवर्थ किती याबाबत माहिती जाणून घेऊया.
इंग्लंडविरूद्ध विश्वचषक सामन्यापूर्वी त्याला स्मृती मानधनाबद्दल विचारलं असता, त्याने एका वाक्यात इतकंच सांगितलं की “ती लवकरच इंदूरची सून होणार आहे.” पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. यानंतर त्यांची लव्हस्टोरी आता लग्नापर्यंत पोहोचलं आहे.
पलाश मुच्छलची एकूण संपत्ती किती? (Palash Muchhal Networth)
पलाश मुच्छल हा बॉलीवूडमध्ये संगीतकार, संगीत संयोजक आणि चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२५ पर्यंत पलाश मुच्छलची एकूण संपत्ती २० ते ४१ कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्याचे उत्पन्न संगीत संयोजन, चित्रपट निर्मिती आणि त्यांच्या विविध प्रकल्पांमधून ही कमाई तो करतो.
पलाश मुच्छल हा संगीत संयोजनाबरोबर तो चित्रपट निर्माता आणि लेखकदेखील आहे. त्याने २०१४ मध्ये ‘डिशकियॉँ’ या चित्रपटासह बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर २०२४ मध्ये काम चालू है हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. पलाश मुच्छल मुंबईतील कोट्यवधींच्या आलिशान घरात राहतो. बॉलिवूडमधील यशस्वी कारकीर्द आणि संगीत तसेच चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उद्योजकीय प्रयत्नांमुळे पलाश मुच्छल आपल्या वयोगटातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींमध्ये गणला जातो.
कोण आहे स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल? (Who Is Palash Mucchal)
पलाश मुच्छल हा ३० वर्षीय भारतीय संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आहे. बहिण पलाक मुच्छल हिच्यासोबत त्याने भारतात आणि परदेशात अनेक स्टेज शो केले आहेत, ज्यातून हृदयशस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांसाठी निधी उभारला जातो. २०१३ पर्यंत त्यांनी अशा उपक्रमांद्वारे त्यांनी सुमारे २.५ कोटी इतका निधी उभा केला होता.
बॉलिवूडमध्ये ‘डिशकियॉँ’ (२०१४) या चित्रपटात पलाशने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘अमित साहनी की लिस्ट’ यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिलं, तसेच ‘पार्टी तो बनती है’ आणि ‘तू ही है आशिकी’ यांसारखी लोकप्रिय गाणी केली. वयाच्या फक्त १८ व्या वर्षी पलाश बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकार बनला आणि त्यांची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये झाली आहे.
स्मृती मानधनाची एकूण संपत्ती किती?
स्मृती मानधनाची एकूण संपत्ती ३२-३४ कोटी इतकी आहे, जी तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीतून आणि ब्रँड जाहिरातींमधून मिळवली आहे.स्मृती-पलाशमुळे आता पुन्हा एकदा क्रिकेट-बॉलीवूडची जोडी एकत्र येताना दिसणार आहे. ज्यामुळे ते भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक बनले आहेत.