आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेशमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पाठीच्या स्नायुंना सोमवारी सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे आगामी  मालिकेतील धोनीच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धोनीला झालेली दुखापत लक्षात घेता पर्यायी यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलची निवड केल्याचे जाहीर केले. मात्र, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धोनीची ही दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते.

निवृत्तीबाबतचे उत्तर बदलणार नाही – धोनी