T20 World Cup, Parthiv Patel on Jitesh Sharma: भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल असे मानतो की, जितेश शर्माचे टी-२० विश्वचषक २०२४ संघात स्थान जवळपास निश्चित आहे. याचे कारण जितेशची वेगवान फलंदाजीची शैली नसून त्याचे संघातील कॉम्बिनेशन आहे. २०२२च्या विश्वचषकात दिनेश कार्तिकने जी भूमिका साकारली होती तेच काम जितेश शर्मा इथे करत आहे. तो खालच्या क्रमाने फलंदाजी करत आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये जितेशने २० चेंडूत ३१ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यातही तो खाते न उघडताच बाद झाला. पार्थिव पटेल जिओ सिनेमावर बोलताना म्हणाला, “भारताचा पर्याय कदाचित एक यष्टीरक्षक असेल जो खालच्या क्रमाने फलंदाजी करू शकेल. जर तुम्हाला खालच्या क्रमाने फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला आक्रमक फलंदाजाची गरज आहे. जितेश शर्मा ज्या पद्धतीने खेळत आहे, तो खूप चांगला पर्याय आहे आणि मला वाटते की त्याचे टी-२० विश्वचषकाचे तिकीट पक्के केले जाऊ लागले आहे. जितेश शर्माचे टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणे माझ्यामते जवळपास निश्चित आहे.” जितेश शर्मा योग्य पर्याय आहे का? रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे टी-२० मध्ये पुनरागमन झाल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासाठी निवड डोकेदुखी कायम आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोहली-रोहितने हे सुनिश्चित केले आहे की, क्रमवारीत इतर कोणालाही संधी मिळणार नाही. त्यामुळे इशान किशन आणि संजू सॅमसनचे प्लेईंग इलेव्हनमधील स्थानही संदिग्ध आहे कारण दोघेही टॉप ५ मध्ये फलंदाजी करत आहेत. यामुळे फिनिशरसाठी पर्याय खुला होतो, जो फिनिशरची भूमिका बजावू शकतो. जितेश शर्माने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जरी त्याने सातत्याने २० आणि ३० धावा केल्या नसल्या तरी त्याने २० चेंडूत ३१ धावा, १९ चेंडूत ३५ धावा आणि १६ चेंडूत २४ धावा अशा खेळी खेळल्या आहेत. हेही वाचा: Australian Open: सुमित नांगलची ऐतिहासिक कामगिरी! १९८९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय भारतीय संघ सोमवारी बंगळुरूला पोहचला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार १७ जानेवारी रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सोमवारी संध्याकाळी उशिरा बंगळुरूला पोहोचला. याची माहिती देताना बीसीसीआयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भारताने पहिले दोन सामने सहज जिंकून मालिका २-०ने अभेद्य विजयी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आता तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करण्याचे रोहित शर्मा अँड कंपनीचे लक्ष्य असेल. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून शानदार विजय नोंदवत मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल शुबमन गिलला मागे अर्धशतक करत ६८ धावा केल्या. अशा परिस्थितीत त्यांना तिसऱ्या टी-२०मध्येही स्थान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. हेही वाचा: Shivam Dube: धोनीच्या छोट्या सल्ल्याने शिवम दुबेची कारकीर्द बदलली, शॉर्ट बॉलबद्दल म्हणाला, “रॉकेट सायन्स नाही पण…” मात्र, भारतीय संघ मधल्या फळीत आणि गोलंदाजीत काही बदल नक्कीच करू शकतो. यामागचे एक कारण टी-२० विश्वचषकासाठी खेळाडूंची चाचपणी घेणे हे असू शकते. गेल्या सामन्यात रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग या भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. तर, फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलने ४ षटकात केवळ १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.