फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपचा सनसनाटी, तर सायनाचा शानदार विजय

भारताचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू केनिची तागो याच्यावर मात करीत फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आश्चर्यजनक विजयाची नोंद केली.

भारताचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू केनिची तागो याच्यावर मात करीत फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आश्चर्यजनक विजयाची नोंद केली. तथापि, सायना नेहवालने दुसरी फेरी गाठताना सहज विजय मिळवला. परंतु एच एस प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांना पहिल्या फेरीचाच अडसर पार करण्यात अपयश आले आहे.
कश्यपने ३८ मिनिटांत तागोला २१-११, २१-१८ असे हरविले. कश्यपचे सहकारी एच.एस.प्रणय व सौरभ वर्मा यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केन्तो मोमोता याने प्रणय याला २१-११, १५-२१, २२-२० असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. इंग्लंडच्या राजीव औसेफ याने सौरभचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.
पाचव्या मानांकित सायनाने फक्त ३७ मिनिटांत फ्रान्सच्या सशिना व्हिग्नेस वाराचा २१-१६, २१-९ असा पराभव केला. वाराविरुद्धची लढत सायनासाठी आव्हानात्मक ठरेल, असे म्हटले जात होते.
मिश्र दुहेरीत भारताची अश्विनी पोनप्पा हिने रशियाच्या व्लादिमीर इव्हानोवा हिच्या साथीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांनी जपानच्या किगो सोनोदा व शिझुको मात्सुओ यांच्यावर २१-१६, २१-१९ अशी मात केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parupalli kashyap stuns world no 4 and easy for saina in french open

ताज्या बातम्या