प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला. यासह पाटणा पायरेट्सने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यूपी योद्धाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पूर्वार्धानंतर पाटणा पायरेट्सने २३-९ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाच्या रेडर्स आणि बचावपटूंना चालू दिले नाही. या कारणास्तव, पहिल्या हाफमध्येच पायरेट्सने यूपी योद्धाला दोनदा (१०व्या आणि १७व्या मिनिटाला) ऑलआऊट केले. यूपी योद्धाच्या परदीप नरवालने १८व्या मिनिटाला पहिला गुण मिळवला आणि पूर्वार्धात त्याला केवळ दोन गुण मिळाले. पाटणा पायरेट्सच्या बचावफळीने पूर्वार्धात ९ टॅकल पॉइंट मिळवले आणि यूपी योद्धाने फक्त दोन सुपर टॅकल केले.

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
nagpur girl injured, generator skin peeled off
धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली…

पाटणा पायरेट्सने दुसऱ्या हाफची सुरुवात जबरदस्त केली आणि लवकरच परदीप नरवाल बाद झाला. पुन्हा एकदा यूपी योद्धाचा संघ ऑलआऊटच्या जवळ आला. श्रीकांत जाधवने सुपर टॅकलद्वारे गुमानसिंगला बाद करून त्याचे ऑलआऊट टाळले. मात्र, सामन्याच्या २९व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने तिसऱ्यांदा यूपी योद्धा ऑलआऊट केले. युपी योद्धाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत अंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्णायक क्षणी परदीप नरवालला बाद करत शाडलूने आपले हाय ५ पूर्ण केले.

हेही वाचा – IPL 2022 : ‘या’ तारखेला होणार फायनल..! मुंबईत खेळवले जाणार ५५ सामने

अखेर युपी योद्धाने सामन्याच्या ३८व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सला प्रथमच ऑलआऊट केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि शेवटी पाटणा पायरेट्सने सामना सहज जिंकला. युपी योद्धाचा संघ पुन्हा एकदा प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही.
या सामन्यात परदीप नरवाल फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ४ गुण मिळू शकले. या सामन्यात तो एकूण ६ वेळा बाद झाला होता. या सामन्यात गुमान सिंगने ८ आणि सचिन तन्वरने ७ गुणांची कमाई केली.