PM Narendra Modi Gesture Win Heart: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा पहिला विजेता बनून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर ५ नोव्हेंबरला, संघातील सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, खेळाडूंनी पंतप्रधानांबरोबर फोटो काढले, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण यादरम्यान मोदींनी ट्रॉफीला हात न लावता फोटो काढला आहे.
फोटोमध्ये पंतप्रधान मोदी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्यामध्ये उभे असल्याचे दिसत आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी विश्वचषक ट्रॉफीला स्पर्शही केला नाही. याचे एक खास कारण आहे.
भारतीय महिला संघाच्या खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाताना फॉर्मल्स घालत मेडल्सही घालून पोहोचल्या होत्या. टीम इंडियाच्या ब्लेझरवर खास बीसीसीआयचा लोगो होता. यादरम्यान टीम इंडियातील खेळाडूंसह कोच अमोल मुझुमदार होते आणि बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास होते. यादरम्यान संपूर्ण संघाबरोबर काढलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं खेळाडूंच्या मधोमध उभे होते आणि दोन्ही बाजूला हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना उभ्या होत्या. त्या दोघींनी पंतप्रधानांसमोर ही ट्रॉफी धरली होती. पण पंतप्रधानांनी या ट्रॉफीला काही हात लावला नाही. पण मोदींच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला संघाच्या ट्रॉफीला स्पर्श का केला नाही?
संघातील खेळाडूंनी मोठे प्रयत्न करत, मेहनतीने ही ट्रॉफी पटकावली. त्यामुळे खेळाडूंची मेहनत आणि जिद्दीला सन्मान देत पंतप्रधान मोदींनी ट्रॉफीला स्पर्श केला. देशाच्या पंतप्रधानांना विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार आहे, परंतु पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी स्पर्श केला नाही. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या सामन्यातील प्रसंगांवरही चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा २०२४ मध्ये, टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाची भेट घेतली, तेव्हाही त्यांनी ट्रॉफीला हात लावला नव्हता. भारतीय संघ सुरूवातीला वेस्ट इंडिजवरून थेट दिल्लीला पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचला होता. तेव्हाही पंतप्रधान मोदींनी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात ट्रॉफीला धरत फोटो काढला. या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.
