Team India on Virat and Rohit: टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली होती, मात्र त्या मालिकेतील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आगामी विश्वचषकासाठी प्रयोग करत आहे, ज्या अंतर्गत या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आता माजी खेळाडू प्रग्यान ओझाला ही विश्रांती देणे पसंत पडलेले नाही, तसेच त्याने संघ व्यवस्थापनाला याबाबत काही प्रश्न विचारले आहेत.

रोहितची फलंदाजी आली, पण विराटला संधी मिळाली नाही

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना एका एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. बाकी दोन्ही सामन्यात रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या विश्रांतीबद्दल माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “विराट आणि रोहितला ज्या उद्देशासाठी विश्रांती देण्यात आली होती, तो उद्देश पूर्ण झाला नाही,” असं तो म्हणाला. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघाची मधली फळी पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे विराट-रोहितला विश्रांती देऊन टीम मॅनेजमेंट काय साध्य केले?” असा प्रश्न त्याने विचारला आहे.

हेही वाचा: Dinesh Kartik: “जगातील सर्वोतम डेथ बॉलर…”, दिनेश कार्तिक बुमराह नव्हे तर ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाचा बनला चाहता

खरेतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन सामन्यांमध्ये खेळवण्यात आले नव्हते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. यानंतर या दोन्ही दिग्गजांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही खेळवण्यात आले नाही. टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, यावरून संघावर बरीच टीका झाली. त्याचवेळी, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामागील कारण म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट असे सांगण्यात आले.

हेही वाचा: ODI world cup: … तिसर्‍याचा लाभ! राहुल-अय्यरची दुखापत अन् शुबमनसाठी कोहली करणार ‘या’ गोष्टीचा त्याग?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाव कसा सावरायचा हे युवा खेळाडूंना कळायला हवे – प्रग्यान ओझा

संघ व्यवस्थापनाला इतर खेळाडूंना संधी देऊन त्यांना आजमावायचे होते, परंतु कोणीही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. प्रग्यान ओझाच्या मते युवा खेळाडूंनी या संधीचा फायदा घ्यायला हवा होता. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही ५० षटकांचा खेळ खेळता तेव्हा तुम्ही तुमच्या डावाचा वेग कसा वाढवता हे खूप महत्त्वाचे असते. रोहित आणि विराटशिवाय मधली फळी कोलमडली. थिंक टँकला विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती द्यायची होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विश्वचषकापूर्वी नव्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. अशा परिस्थितीत या तरुणांनी त्यांना उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यावा. डावाला वेग कसा द्यायचा हे त्याला माहीत असायला हवे. या उणिवा लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. जेणेकरून गरज भासल्यास वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत हे खेळाडू ही जबाबदारी उचलू शकतील.”