मलेशिया मास्टर ग्रांपी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजेतेपद पटकावले आहे. सिंधूचे हे या वर्षातील पहिले विजेतेपद आहे.
सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमॉरचा २१-१५,२१-९ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पहिल्या गेमध्ये ग्लिमोरने सिंधूचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱया गेममध्ये सिंधू ग्लिमोरला प्रतिकाराची कोणतीही संधी मिळू न देता विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी आहे. ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील सिंधूचे हे पाचवे विजेतेपद आहे. याआधी तिने ही स्पर्धा मलेशियात २०१३ साली जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत २०१३ ते २०१५ अशी हॅटट्रिक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2016 रोजी प्रकाशित
पी.व्ही.सिंधूने पटकावले मलेशियन ओपनचे जेतेपद
सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 24-01-2016 at 15:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu starts 2016 with malaysia masters badminton crown