scorecardresearch

Premium

India vs England : बार-बार लगातार…. अश्विनच्या जाळ्यात आठव्यांदा अडकला ‘हा’ दिग्गज

रवींद्र जडेजानेही सात वेळा केले आहे बाद.

India vs England : बार-बार लगातार…. अश्विनच्या जाळ्यात आठव्यांदा अडकला ‘हा’ दिग्गज

भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव २८७ धावांत आटोपला. अनुभवी अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ४ बळी टिपले. अश्विनने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकला आठव्यांदा बाद केले. काल सामना सुरु झाल्यानंतर नवव्या षटकांत अश्विने कुकच्या यष्ट्या उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले होते. कुकने १३ धावांची खेळी केली.

याबरोबरच कुक आपला सर्वात आवडता शिकार असल्याचे अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध केले. कसोटी सामन्यात कुकला आतापर्यंत आठ वेळा दोन फिरकी गोलंदाजांनी बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑन आणि आर. अश्निन यांनी कुकला आठ वेळा बाद केले आहे. अश्विन शिवाय रवींद्र जाडेजाने कुकला सात वेळा बाद केले आहे. कुकला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्यांमध्ये अश्विन नॅथन लिऑनसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. कुकशिवाय अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरला नऊ वेळा बाद केले आहे.

11 year old boy created a mosaic art of Shree Ram
Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…
IND vs ENG 1st test match updates in marathi
IND vs ENG : ‘आधी पॅड की बॅट…’, रवींद्र जडेजाच्या एलबीडब्ल्यू आऊटवरुन निर्माण झाला गोंधळ
kangana ranaut raised slogans of jai shree ram at ayodhya
Video : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान कंगनाचा उत्साह शिगेला; ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतानाचा व्हिडीओ व्हायरल
Ram Mandir Pran Pratishtha Ceremony Updates in marathi
Ram Mandir Ayodhya Inauguration : सचिन-जडेजासह ‘हे’ स्टार क्रिकेटर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले

अश्विनने पहिल्या दिवशी ६० धावा देताना चार फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला. आशियाच्या बाहेर पहिल्या दिवशी चार बळी घेणारा अश्विन चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे. भारताकडून याआधी माजी फिरकी गोलंदाज बी. चंद्रशेखर यांनी १९७६ मध्ये पहिल्या दिवशी ९४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते.

भारताची अडखळत सुरुवात –

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव २८७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे कर्णधार रूटने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर बेअरस्टोने ७० धावांची खेळी केली. अश्विनने ४ तर मोहम्मद शमीने ३ बळी टिपले. त्यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. भारताने बिनबाद ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन तिघे झटपट बाद झाले. सध्या कर्णधार विराट कोहली ९ तर अजिंक्य रहाणे ८ धावांवर खेळत आहे.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: R ashwin dismisses alaister cook 8th times among spinners

First published on: 02-08-2018 at 18:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×