R Ashwin on Team India superstar culture : माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय क्रिकेटमधील परिस्थिती सामान्य करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. संघातील सुपरस्टार संस्कृती संपवण्याच्या आवाहनादरम्यान त्यांची ही टिप्पणी आली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर हे अधोरेखित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंवर विविध निर्बंध लादले आहेत.

आर अश्विनने आता त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला की, खेळाडू हे अभिनेते नसतात. भारतीय क्रिकेट संघात सुपरस्टारडमला प्रोत्साहन देऊ नये असेही ते म्हणाले. तामिळनाडूच्या या फिरकी गोलंदाजा म्हणाला की, क्रिकेटपटू असे असले पाहिजेत की ज्यांच्याशी सामान्य लोक जोडले जाऊ शकतील. पुढे जाण्यासाठी परिस्थिती सामान्य करण्याची तातडीने गरज आहे, यावरही त्याने भर दिला आहे.

सुपरस्टार संस्कृतीला प्रोत्साहन देऊ नये – आर अश्विन

रविचंद्रन अश्विन म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये गोष्टी सामान्य करणे महत्वाचे आहे. आपण भारतीय क्रिकेट संघात सुपरस्टारडम आणि सुपरस्टार संस्कृतीला प्रोत्साहन देऊ नये. आपण पुढे जाताना या सर्व गोष्टी सामान्य केल्या पाहिजेत. आपण क्रिकेटपटू आहोत. आपण अभिनेते किंवा सुपरस्टार नाही. आपण खेळाडू आहोत आणि आपण असे असले पाहिजे की ज्याच्याशी सामान्य लोक जोडले जाऊ शकतील आणि त्यांच्याशी स्वतःची तुलना करू शकतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विन विराट-रोहितचे दिले उदाहरण –

माजी फिरकीपटू पुढे म्हणाला, “उदाहरणार्थ, जर तुम्ही रोहित शर्मा किंवा विराट कोहली असाल, ज्यांनी खूप काही साध्य केले आहे. जेव्हा तुम्ही अजून एक शतक झळकावता, तेव्हा ते फक्त तुमच्या यशाबद्दल नसते. ते नेहमीसारखेच असले पाहिजे आणि आपले ध्येय या यशांपेक्षा मोठे असले पाहिजेत.” टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ही सुपरस्टार संस्कृती संपवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. बीसीसीआयने खेळाडूंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की आता कोणताही खेळाडू संघापासून वेगळा प्रवास करणार नाही. सर्व संघ एकाच बसने प्रवास करतील.