Rachin Ravindra says no guarantee whether I will be selected in the IPL auction : आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावेळी लिलावात अनेक नवीन खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते. त्याचबरोबर २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर लिलावात बराच पैसा खर्च होणार आहे. यावेळी, एकदिवसीय विश्वचषकात काही फलंदाजांची कामगिरी चांगलीच झाली आहे. या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम कामगिरीने जगभरातील लाखो चाहत्यांची मने जिंकली.

आता सर्व फ्रँचायझी आयपीएल २०२४ च्या लिलावात या खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवून असतील. या खेळाडूंपैकी एक आहे न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र. यावेळी आयपीएल लिलावात रचिनबाबत सर्व फ्रँचायझी आपसात भांडू शकतात. मात्र लिलावापूर्वी रचिनचे एक वक्तव्य समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

No captain or selector can ignore him Support grows for Shivam Dube's
T20 WC 2024 : ‘कोणताही कर्णधार किंवा निवडकर्ता ‘या’ खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही’: आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य
Umpire Richard Kettleborough on Sanju Samson and Team India
T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा
Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना

लिलावापूर्वी रचिन रवींद्रचे मोठे वक्तव्य –

एकीकडे चाहत्यांना वाटते की रचिन रवींद्रला आयपीएल २०२४ च्या लिलावात मोठी बोली लागू शकते, तर दुसरीकडे रचिनला असे वाटते की यावेळी लिलावात तो अनसोल्ड राहू शकतो. ईएसपीएन क्रीक इन्फोशी बोलताना रचिन रवींद्र म्हणाला, “माझ्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडकडून खेळणे. माझे संपूर्ण लक्ष आगामी मालिकेवर आहे. आयपीएल लिलावात माझी निवड होईल की नाही याची शाश्वती नाही. सध्या आयपीएलसाठी बराच वेळ शिल्लक आहे. न्यूझीलंडकडून खेळण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि माझे लक्षही यावर आहे.”

हेही वाचा – World Cup 2024 : रोहित शर्माबद्दल सौरव गांगुलीचे मोठं वक्तव्य! म्हणाला, “टी-२० विश्वचषकात त्याला…”

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शानदार कामगिरी –

रचिन रवींद्रला २०२३ मध्ये न्यूझीलंडकडून एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. रचिनने ही संधी दोन्ही हातांनी स्वीकारत दमदार प्रदर्शन केले. रचिनने आपल्या पहिल्याच एकदिवसीय विश्वचषकात जगाला वेड लावले. यावेळी विश्वचषकातही त्याने आपल्या बॅटने तीन शानदार शतके झळकावली. या स्पर्धेत त्याने ५५० धावा केल्या. फलंदाजीसोबतच रचिन अप्रतिम गोलंदाजीही करतो.