जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने दुखापतींना बाजूला सारत रिओ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदोची कमाई केली. पाठ तसेच डाव्या हाताला झालेली दुखापत यामुळे नदालला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या दुखापतीतून सावरत नदालने यशस्वी पुनरागमन केले आहे. अंतिम लढतीत त्याने युक्रेनच्या अलेक्झांड्र डोलगोपोव्हवर ६-३, ७-६ असा विजय मिळवला. १३ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालने दुखापतींची कोणतीही लक्षणे न दाखवता आगेकूच केली. नदालचे हे कारकिर्दीतील ४८वे जेतेपद आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
नदालकडे रायो ओपनचे अजिंक्यपद
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने दुखापतींना बाजूला सारत रिओ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदोची कमाई केली.
First published on: 24-02-2014 at 08:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal beats alexandr dolgopolov to win rio open