कर्णधार आणि विकेटकीपर संजू सॅमसनने रिलीज करण्याची विनंती केल्याने राजस्थान रॉयल्सने २०२६ हंगामापासून नवी सुरुवात करावी लागणार आहे. संजू चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. संजू नसल्यामुळे राजस्थानला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांची नावं चर्चेत आहेत. ध्रुव जुरेलचंही नाव शर्यतीत आहे.

ट्रेडनुसार संजू चेन्नईकडे गेल्यानंतर राजस्थानच्या ताफ्यात रवींद्र जडेजासारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू दाखल झाला आहे. फिरकीची बाजू अतिशय मजबूत झाली आहे. सॅम करनच्या रुपात त्यांच्याकडे अष्टपैलू वेगवान गोलंदाज आहे. जोफ्रा आर्चरला दुखापतींची शक्यता नेहमीच असते. अशा परिस्थितीत एका वेगवान गोलंदाजाच्या राजस्थान प्रतीक्षेत आहे. राजस्थानने नितीश राणाला दिल्लीबरोबर ट्रेड केलं आहे. त्याच्या बदल्यात डोनाव्हन फरेराला समाविष्ट केलं आहे.

रिलीज केलेले खेळाडू

संजू सॅमसन (ट्रेडआऊट), नितीश राणा (ट्रेडआऊट), वानिंदू हासारंगा, महेश तीक्षणा, फझलक फरुकी, आकाश मढवाल, अशोक शर्मा, कुणाल राठोड, कुमार कार्तिकेय</p>

रिटेन केलेले खेळाडू

शुभम दुबे, रवींद्र जडेजा (ट्रेड इन), सॅम करन (ट्रेड इन) शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, ल्युहान डी प्रिटोरस, वैभव सूर्यवंशी, डोनाव्हन फरेरा (ट्रेड इन),नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, क्वेना मफाका.