भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रणजी करंडक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला असून गतविजेत्या मुंबईची सलामीची लढत हरियाणाशी होणार आहे. ‘अ’ गटातील हा सामना हरियाणाध्ये २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाईल. ‘ब’ गटामध्ये पहिलाच सामना दोन बलाढय़ संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता सौराष्ट्रचा संघ राजकोटला राजस्थानशी दोन हात करणार आहे.
मुंबईचे सामने पुढीलप्रमाणे
दिनांक प्रतिस्पर्धी ठिकाण
२७-३० ऑक्टोबर हरियाणा हरियाणा
७-१० नोव्हेंबर पंजाब पंजाब
१४-१७ नोव्हेंबर दिल्ली मुंबई<br />२८ नोव्हें.-१ डिसेंबर विदर्भ मुंबई
६-९ डिसेंबर झारखंड मुंबई
१४-१७ डिसेंबर ओरिसा मुंबई
२२-२५ डिसेंबर कर्नाटक कर्नाटक