पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध विक्रमी खेळी खेळली. त्याने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या खेळीनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड निधी तापडियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना कौतुक केले.

मुंबई संघाकडून डावाची सलामी देणाऱ्या पृथ्वी शॉने आसामविरुद्ध विक्रमी खेळी केली. त्याने ३८३ चेंडूत ३७९ धावा केल्या. त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नसल्याने ही खेळीही खास आहे. कारण या खेळीकडे उत्तर म्हणून पाहिले जात आहे. ही धावसंख्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ४४३ आहे, निंबाळकर यांनी १९४८-४९ मध्ये काठियावाडविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना केली होती.

हेही वाचा – PAK vs NZ: नजर हटी दुर्घटना घटी! लाईव्ह सामन्यात फलंदाजी सोडून पत्नीकडे पाहणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूचा VIDEO व्हायरल

कथित गर्लफ्रेंड निधीने अशी प्रतिक्रिया दिली –

निधी तापडीया इंस्टाग्राम स्टोरी

पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड निधी तापडियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना या खेळीचे कौतुक केले. निधीने यापूर्वी शॉचे शतक पूर्ण करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर पृथ्वीचा व्हिडिओ शेअर करताना निधीने “तोडफोड इनिंग” असे लिहिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
निधी तापडीया इंस्टाग्राम स्टोरी

यानंतर पृथ्वी शॉने आज त्रिशतक पूर्ण केल्यावर निधीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. तिने लिहिले, जे प्रयत्न करतात त्यांचा पराभव होत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वी शॉ संघात स्थान मिळवू शकलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहतेही पृथ्वी शॉला वगळल्याने आपला राग व्यक्त करत आहेत.