Ravi Shastri told whether the Indian team can chase the target of 444 runs or not: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दोन्ही डावात शानदार फलंदाजी करत भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. यावर आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांनी भारताला ४४४ धावांचे लक्ष्य पार होईल की नाही? हे सांगितले आहे.

रवी शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान टीम इंडिया ४४४ धावांचा पाठलाग करण्याच्या शक्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडिया या धावांचा पाठलाग करू शकते की नाही हे त्यांनी सांगितले. रवी शास्त्रीच्या म्हणण्यानुसार, खेळात विचित्र गोष्टी घडत राहतात आणि याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय संघ या विश्वविक्रमाचा पाठलागही करू शकतो.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २७० धावांवर घोषित केला. त्याचबरोबर दोन्ही डावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कसोटीचा गदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतांवर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया –

स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हा गेम खूप विचित्र गोष्टी दाखवतो. या खेळात विचित्र गोष्टी घडत असल्याचे आपण पाहिले आहे. हा विश्वविक्रमी धावांचा पाठलाग असेल. खेळपट्टीने ज्या प्रकारची वर्तने केले त्याचे मला खूप आश्चर्य वाटते.”

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ५१ षटकांनंतर ५ बाद १९. धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही विजयासाठी २५४ धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताच्या हातात ५ विकेट्स असून अजिंक्य रहाणे ३१ आणि श्रीकर भरत ९ धावांवर खेळत आहे. असे असले तरी भारतीय संघ विराट कोहलीच्या बाद होण्याने मोठ्या अडचणीत सापडला आहे. विराट कोहली ७८ चेंडूत ४९ धावा करुन झेलबाद झाला.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलवर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया, म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील प्रत्येकाला वाटेल की…”

भारतीय संघाला जिंकायचे असेल तर अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत यांना मोठी भागीदारी करावी लागेल. तसेच प्रत्येकी मोठी खेळी खेळावी लागेल.