Asia Cup commentary Pannel: आशिया चषक २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, आशिया कप २०२३साठी समालोचकांची यादी जाहीर झाली आहे. त्यात भारत आणि पाकिस्तानमधील काही मोठ्या माजी क्रिकेट पटूंचा समावेश करण्यात आला आहे. एकूण १२ समालोचक या आशिया चषकात समालोचन करणार असून त्यापैकी ५ समालोचक हे भारतीय असतील. मात्र, एका स्टार समालोचकाला या यादीतून वगळण्यात आले आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड चाहता वर्ग असून त्याला समालोचकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

भारतातून निवडलेल्या समालोचकांमध्ये गौतम गंभीर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, इरफान पठाण आणि दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे. वसीम अक्रम, वकार युनूस, बाझिद खान आणि रमीझ राजा पाकिस्तानकडून यांचा समावेश करण्यात आला आहे. अजहर अली खान बांगलादेशकडून तर सह-यजमान रसेल अर्नोल्ड श्रीलंकेचे समालोचन करतील. स्कॉट स्टायरिसचा देखील यादीत समालोचक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत

आशिया चषक २०२३ भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल.

हेही वाचा: IND vs PAK: विश्वचषकात पाकिस्तान संघाला विशेष वागणुकीवरून परराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्यांनाही इतर…”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. पीसीबीने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पीसीबीने आशिया चषक तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी समान संघाची घोषणा केली आहे. हाच संघ २ सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत भारतासमोर खेळणार आहे. वास्तविक, आशिया कप अंतर्गत फायनलसह एकूण १३ सामने होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. यातील ४ सामने पाकिस्तानमध्ये होणार असून उर्वरित फायनलसह ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दबदबा

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे १५ हंगाम आले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८) विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो ६ वेळा (१९८६, १९९७, २००४, २००८, २०१४, २०२२) चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानला केवळ दोनदा (२०००, २०१२) विजेतेपद मिळवता आले.

आशिया कप २०२३साठी समालोचन पॅनेल

रवी शास्त्री, संजय मांजरेकर, रसेल अर्नोल्ड, गौतम गंभीर, इरफान पठाण, स्कॉट स्टायरिस, वसीम अक्रम, वकार युनूस, अथर अली खान, दीप दासगुप्ता, रमीझ राजा, बाजिद खान.

आशिया कप वेळापत्रक

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान, ३१ ऑगस्ट: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी, २ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी, ३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर, ४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी, ५ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

हेही वाचा: IND vs WI 4th T20: टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार? फ्लोरिडा मधील आकडे भारताच्या बाजूने, जाणून घ्या प्लेईंग ११

सुपर-४ स्टेज शेड्यूल ६ सप्टेंबर

A1 वि B2 – लाहोर ९ सप्टेंबर: B1 वि B2 – कोलंबो (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असू शकते) १० सप्टेंबर: A1 वि A2 – कोलंबो (भारत विरुद्ध पाकिस्तान असू शकते) १२ सप्टेंबर: A2 वि B1 – कोलंबो १४ सप्टेंबर: A1 वि B1 – कोलंबो १५ सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 – कोलंबो १७ सप्टेंबर: अंतिम – कोलंबो