इंग्लंडविरूध्दच्या कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी दबदबा निर्माण केला आहे. आपल्या १००व्या कसोटी सामन्यात ९ विकेट घेत अश्विनने गोलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे, तर संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-१० मध्ये परतला आहे. ताज्या ICC रँकिंगमध्ये टॉप-१० फलंदाजांच्या यादीत हिटमॅन ७५१ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या धरमशाला कसोटीत अश्विनने सर्वोत्तम कामगिरी केली. भारताच्या या अनुभवी अष्टपैलूने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात ३६व्यांदा पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटीत शानदार विजयाची नोंद केली. अश्विनने त्याचा सहकारी गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे. अश्विन हा गोलंदाजांच्या यादीत कसोटीमध्ये पूर्वीपासूनच जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता पण बुमराहने इंग्लंड कसोटीत दमदार कामगिरी केल्याने तो क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला. पण पुन्हा एकदा अश्विनने आपल्या पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

धरमशाला कसोटीत शतक झळकावणाऱ्या रोहितने पाच स्थानांनी झेप घेत सहावे स्थान गाठले आहे. रोहित पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज केन विल्यमसनपेक्षा १०८ रेटिंग गुणांनी मागे आहे. यशस्वी जैस्वाल (२ स्थानांनी झेप) आठव्या स्थानावर आणि शुभमन गिल (११ स्थानांनी झेप) २० व्या स्थानावर आले आहेत. या दोघांनीही बॅझबॉलविरूध्द शानदार कामगिरी केल्याने त्यांच्या करियरमधील सर्वात्तम रँकिंग त्यांना मिळाली आहे.

क्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सहा विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बुमराहसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनचा सहकारी कुलदीप यादवने त्याच्या कारकिर्दीतील नवे सर्वोच्च रेटिंग मिळवले आहे आणि इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत त्याने ७ विकेट्स घेतल्याने त्याला सामनावीर म्हणूनही घोषित केले कुलदीपने क्रमवारीत १५ स्थानांनी झेप घेत, तो १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा मॅट हेन्री (सहा स्थानांनी झेप घेत १२ व्या स्थानी) देखील कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमांकावर पोहोचला.

भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा कसोटीमधील अष्टपैलूंच्या यादीत ४४४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अश्विन ३२२ गुणांसह आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (दोन स्थानांनी झेप घेत आठव्या स्थानावर) आणि हेन्री (सहा स्थानांनी झेप घेत ११व्या स्थानावर) यांनी मोठी झेप घेतली आहे.