Ravichandran Ashwin’s wait for his 500th Test wicket : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना अनेक चढउतारांनी भरलेला राहिला. प्रथम यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून कौतुकास पात्र छरला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने भारतीय खेळपट्ट्यांवरही वेगवान गोलंदाज किती प्रभावी ठरू शकतात हे दाखवून दिले. सामन्याच्या तिसऱ्या डावात शतक झळकावून शुभमन गिलने हे सिद्ध केले की त्याला पुनरागमन कसे करायचे ते चांगलेच माहीत आहे. त्याचवेळी, सामन्याच्या चौथ्या दिवशी, अश्विन कसोटीतील ५०० वी विकेट घेण्याच्या जवळ आला होता, परंतु आता त्याला हा पल्ला गाठण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॉम हार्टलीच्या विकेटवरुन निर्माण झाला गोंधळ?

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ६३ वे षटक टाकले. षटकातील पाचव्या चेंडूला सामोरे जात टॉम हार्टलीने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला आणि हवेत गेला. रोहित शर्माने हा झेल घेतला आणि भारतीय संघ सेलिब्रेशन करु लागला. कारण अंपायरने देखील आऊट दिले होते, पण हार्टलीने रिव्ह्यू घेतला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. चेंडू फलंदाजाच्या हाताला लागला आणि हवेत उडाला. त्यामुळे अशा स्थितीत त्याला झेलबाद घोषित केले जाऊ शकत नाही. नियमानुसार तिसऱ्या पंचाने एलबीडब्ल्यू तपासले. यामध्ये इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवर आदळण्याचा निर्णय अंपायरच्या निर्णयावर गेला.

अंपायरने पहिल्यांदा फलंदाजाला आऊट घोषित केले होते. त्यानुसार फलंजदाजाला आऊटच द्यायला हवे होते. पण तिसऱ्या अंपायरने रिव्ह्यू पाहिल्यानंतर मैदानावरील अंपायरने नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. याबाबत भारतीय कर्णधार रोहित आणि अश्विनने अंपायरला प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की, आपला निर्णय फलंदाजाला झेलबाद देण्याचा होता. त्यांनी एलबीडब्ल्यूसाठी नॉट आऊट घोषित केले होते. यामुळे फलंदाज नॉट आऊट राहिला.

हेही वाचा – IND vs ENG Test : रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी शेवटच्या तीन विकेट घेत भारताला १०६ धावांनी विजय मिळवून दिला. अशाप्रकारे रविचंद्रन अश्विनच्या कसोटीतील ५००व्या विकेटची प्रतीक्षा लांबली. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी ९७ कसोटी सामन्यात ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. मालिकेतील दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.