Ravindra Jadeja: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या सामन्याचे हिरो ठरले. हा अनिर्णित राहिलेला सामना भारतीय संघासाठी विजयापेक्षा कमी नाही. इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६६९ धावांचा डोंगर उभारला होता. यासह ३०० हून अधिक धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी आधी या ३०० धावा करायच्या होत्या. त्यानंतर पूर्ण दिवस फलंदाजी करण्याचं आव्हान होतं. हे आव्हान भारतीय संघाने पूर्ण केलं. इंग्लंडचे खेळाडू हात जोडून सामना थांबवण्याची विनंती करत होते. पण भारतीय खेळाडू शेवटपर्यंत उभे राहिले. जडेजा आणि सुंदरने आपलं शतक पूर्ण केलं, त्यानंतर हा सामना थांबवण्यात आला.

सामन्यानंतर रवींद्र जडेजाचं मन जिंकणारं कृत्य

तुम्हाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना नक्कीच आठवत असेल. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. हा सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवर गेला आणि खेळपट्टीवरील माती चाखली होती. आता मँचेस्टरच्या मैदानावर सामना ड्रॉ करणं हे देखील भारतीय संघासाठी मोठं यश आहे. कारण हा सामना गमावला असता, तर मालिका देखील हातून निसटली असती. या सामन्यात भारताचा विजय अशक्य वाटत होता. पण शेवटी जडेजा आणि वॉशिंग्टनची लढाऊ वृत्ती पाहायला मिळाली.

भारतीय संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून रवींद्र जडेजाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यात सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा खेळपट्टीवर जाऊन खेळपट्टीच्या पाया पडताना दिसत आहे. ज्या खेळपट्टीवर त्याने आपलं शतक पूर्ण केलं, त्या खेळपट्टीवर त्याने हे मन जिंकणारं कृत्य केलं आहे. या फोटोवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३५८ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारून भारतीय संघावर मोठी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघाला सामना वाचवण्यासाठी पूर्ण दिवस खेळून काढायचा होता. भारताला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के बसले होते. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल आणि त्यानंतर साई सुदर्शन हे दोघेही शून्याव माघारी परतले. त्यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने मिळून डाव सांभाळला. या दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. गिलने आपलं शतक पूर्ण केलं. तर केएल राहुलने ९० धावांची खेळी केली. शेवटी जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने शतक पूर्ण केलं.