Virat Kohli coming to India for IPL 2024 : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास दोन महिने लंडनमध्ये घालवल्यानंतर विराट कोहली अखेर भारतात परतला आहे. नुकतेच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. विराट कोहली भारतात परतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला होता. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर लंडनमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी उपस्थित होता. अनुष्का शर्माने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुलगा अकायला जन्म दिला. याची माहिती खुद्द विराट कोहलीने सोशल मीडियावर दिली होती. आता विराट कोहली आपली संपूर्ण जबाबदारी पार पाडून भारतात परतला आहे.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

विराट कोहली एकटाच परतला भारतात –

सध्या विराट कोहली एकटाच भारतात परतला आहे. तो लवकरच त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे. विराट कोहली आपल्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) चॅम्पियन बनवण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तीनदा फायनलमध्ये पोहोचले आहे, परंतु एकही ट्रॉफी उचलू शकली नाही आणि तिन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या आयपीएल हंगामात कोहलीने १४ सामन्यांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या होत्या, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात नाबाद १०१ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

हेही वाचा – IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, स्टार गोलंदाज आयपीएलमधून ४-५ आठवडे बाहेर राहण्याची शक्यता

विराट कोहलीची आयपीएलमधील कामगिरी –

२२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२४ चा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. विराट कोहली मैदानावर विक्रमांची रांग लावण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने २३७ आयपीएल सामन्यांमध्ये ३७.२५ च्या सरासरीने ७२६३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या कालावधीत ७ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ११३ धावा आहे. आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.