2019 साली आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाची तारीख निश्चीत झाल्याचं वृत्त समोर येतं आहे. ‘मुंबई मिरर’ ने दिलेल्या माहितीनुसार 18 डिसेंबरला दुपारी 3 वाजता हा लिलाव पार पडला जाणार आहे. या लिलावाची जागा अजुन नक्की करण्यात आलेली नसली, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमध्ये हा सोहळा रंगण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारणपणे आयपीएलच्या लिलावाला सकाळी 10 वाजता सुरुवात होते. मात्र प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळाला यासाठी आगामी हंगामाचा लिलाव हा प्राईम टाईममध्ये म्हणजेच दुपारी 3 वाजता ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. 3 वाजता सुरु होणारा लिलाव हा रात्री साडे नऊ वाजता संपेल, अशी सुचना सर्व संघमालकांना देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे या लिलावात नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि कोणता खेळाडू कोणाच्या संघात जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reports ipl auction 2019 to be held on december 18th
First published on: 25-11-2018 at 14:16 IST