क्रिकेट सामन्यांमध्ये आपण अनेक विचित्र रनआऊट, विकेट्स आणि फलंदाजांना बाद झालेलं पाहिलं आहे. जगातील अनेक अव्वल गोलंदाजांनी स्वप्नवत चेंडूंवर अनेक फलंदाजांना बाद केलं आहे. काही गोलंदाजांनी तर फलंदाजांना त्रिफळाचीत करताना स्टम्पचे दोन तुकडेही केले आहेत. पण ८ जुलैला झालेल्या व्हिटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेतील सामन्यात एका गोलंदाजाने थेट स्टम्प उभा चिरला आहे. या थक्क करणाऱ्या घटनेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गोलंदाजाने फलंदाजाला त्रिफळाचीत केल्यानंतर स्टम्पचे सहसादोन तुकडे होतात, स्टम्प उभा कसा काय चिरला जाऊ शकतो, असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. जणू काही करवताने हा स्टम्प उभा चिरला आहे की काय असा फोटो बघितल्यावर प्रश्न पडतो. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने मात्र असा रॉकेट चेंडू टाकला आहे की, ही अनपेक्षित घटना सत्यात पाहायला मिळाली आहे.

८ जुलै रोजी व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये सोमरसेट आणि एसेक्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सोमरसेटकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथने आपल्या चेंडूने स्टम्पचे उभे दोन तुकडे पडले. सामन्यातील पहिली विकेट घेताना त्याने ही अनपेक्षित कामगिरी केली. मेरेडिथने एसेक्सचा सलामीवीर मायकेल पेपरची पहिली विकेट घेतली. मेरेडिथने पेपरला बाद केलं पण त्यानंतरच्या दृश्याने सर्वांनाच धक्का बसला. कारण क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच असा प्रसंग पाहायला मिळाला.

रिले मेरेडिथने टाकलेला चेंडू स्टम्पवर आदळल्यानंतर स्टम्पचे मधूनच दोन तुकडे झाले आहेत. स्टम्पचा अर्धा भाग आपल्या जागी आहे तर उर्वरित तुकडा हा जमिनीवर फेकला गेला. रिले मेरेडिथने एसेक्सचा सलामीवीर मायकेल पेपरला त्याच्या वैयक्तिक १३ धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली जी चार्ली अ‍ॅलिन्सनची होती. रिले मेरेडिथने सामन्यात २ षटकांत २२ धावा देत २ विकेट घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिले मेरेडिथने एसेक्सचा सलामीवीर मायकेल पेपरला १३ धावांवर बाद केलं. त्यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली जी चार्ली अ‍ॅलिन्सनची होती. रिले मेरेडिथने सामन्यात २ षटकांत २२ धावा देत २ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेला कांगारू गोलंदाज रिले मेरेडिथ त्याच्या कमालीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या व्हाइटॅलिटी ब्लास्ट टी-२० लीगमध्ये सोमरसेटकडून खेळत आहे.