IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ १३.२ षटकांचाच खेळ होऊ शकला. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर बुमराहने सुरूवातीलाच २ विकेट्स घेतले. यासह टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. यानंतर पंत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या यादीत सामील झाला आहे.

जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी गोलंदाजीची सुरुवात केली. यासह बुमराहने स्पेलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात विकेट्स घेतले. बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. बुमराहने १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ऋषभ पंतकरवी झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. ही विकेट घेतल्यावर ऋषभ पंतने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. त्यानंतर आता पंतने य़ष्टीरक्षण करताना १५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. ज्यामध्ये १३५ झेल आणि १५ स्टंपिंगचा समावेश आहे.

Zimbabwe Player Johnathan Campbell Captains on Test Debut Father Was Alistair Campbell
IRE vs ZIM: कसोटीत पदार्पण करताच खेळाडूला दिलं कर्णधारपद, वडिलही होते राष्ट्रीय संघाचे कर्णधार
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
IND vs ENG Harshit Rana creates all time unwanted record for India on ODI debut against England in Nagpur
IND vs ENG : आधी धुलाई, नंतर जबरदस्त कमबॅक…पदार्पणवीर हर्षित राणाने पुनरागमन करत सामन्याला दिली कलाटणी
Rohit Sharma Gives Update on Virat Kohli Knee Injury on Toss of IND vs ENG 1st ODI
IND vs ENG: विराट कोहली पहिल्या वनडेत का नाही? रोहित शर्माने दिले अपडेट
Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम

हेही वाचा – IND vs AUS: विराटने ‘नैनोंं में सपना’ गाण्यावर डान्स करत हरभजनची घेतली फिरकी, अचानक डान्स का करू लागला कोहली? पाहा VIDEO

कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून विकेटच्या मागे सर्वाधिक झेल टिपणारा पंत आता भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे पंतने अवघ्या ४१ सामन्यांमध्ये हे विशेष यश संपादन केले आहे. मात्र, सध्या तो माजी दिग्गज एमएस धोनी आणि राहुल द्रविडपेक्षा खूप मागे आहे.

माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत पहिल्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने ९० सामन्यांमध्ये २९४ एकूण फलंदाजांना बाद केलं, ज्यात २५६ झेल आणि ३८ स्टंपिंगचा समावेश आहे. याशिवाय राहुल द्रविडचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने १६३ सामन्यात विकेट कीपिंग करताना २०९ फलंदाजांना बाद केलं आहे.

हेही वाचा – Mohammed Shami: शमीला ऑस्ट्रेलिया नाही हैदराबादचं मिळालं तिकीट, गाबा कसोटीदरम्यान आली मोठी अपडेट

सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारे यष्टीरक्षक

एमएस धोनी (२००५-१४)

९० सामने
२५६ यष्टिरक्षक म्हणून झेल
३८ स्टंपिंग
एकूण बाद: २९४.

सय्यद किरमाणी (१९७६-१९८६)

८८ सामने
१६० यष्टिरक्षक म्हणून झेल
३८ स्टंपिंग
एकूण बाद: १९८.

ऋषभ पंत (२०१८-२०२४)

४१ सामने
१३५ यष्टिरक्षक म्हणून झेल
१५ स्टंपिंग
एकूण बाद: १५०

किरण मोरे (१९८६-१९९३)

४९ सामने
११० यष्टिरक्षक म्हणून झेल
२० स्टंपिंग
एकूण बाद: १३०

Story img Loader