scorecardresearch

“ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे.

“ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती
ऋषभ पंत कार अपघात (फोटो सौजन्य- AP आणि इन्स्टाग्राम)

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला चेहऱ्यावर, पाठ आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता दिल्ली-देहरादून महामार्गावर हा अपघात झाला. दरम्यान, उपचारादरम्यान ऋषभ पंतसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

आईला सरप्राईज देण्यासाठी जात होता ऋषभ पंत

मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याच्यावर रुरकी येथील सक्षम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्यावर सर्वात अगोदर डॉ. सुशील नागर यांनी उपचारास सुरुवात केली. त्यांनीच ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी घरी जात होता, असे सांगितले आहे. तो नुकताच यूएईहून परतला होता.

आणखी वाचा – Rishabh Pant Car Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऋषभ पंतच्या आईला फोन

पंतच्या चेहऱ्यावर जखम, गुडघ्याला दुखापत

डॉ. नागर यांनी ऋषभ पंतच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्याच्या हाडांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र गुडघ्यांचे लिगामेंट्स आणि पाठीला दुखापत झालेली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ऋषभ पंत शुद्धीवर होता, असे नागर यांनी सांगितले. ऋषभ पंतवर मॅक्स रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा – Rishabh Pant Video: “गाडी हळू चालवत जा”, ऋषभ पंतला शिखर धवननं दिला होता सल्ला; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

नेमका कोठे घडला अपघात?

दरम्यान, ऋषभ पंत हा दिल्लीहून उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करत ऋषभला रुग्णालयात दाखल केले. अपघातावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 17:51 IST

संबंधित बातम्या